Samaj kalyan vibhag yojana 2024

 सन- २०२४-२५ जिल्हा परिषद २० टक्के समाजकल्याण योजना अटी व शर्ती. 

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून वीस टक्के निधीतून मागासवर्गीय घटकांकरीता 2024-25 साठी  विविध योजना राबविल्या जात असून त्या योजनांचे स्वरूप आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे अटी शर्ती त्याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे  या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आपल्या ग्रामपंचायती ऑफिसमध्ये याबद्दल चौकशी करायची आहे तसेच पंचायत समिती ऑफिसमध्ये तुम्ही याबद्दल चौकशी करू शकता. 


मागासवर्गीय शेतक-यांना कडबाकुटी यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे


१. विहीत नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरावा.


२. लाभार्थी शेतकरी अनु जाती, अनु जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौध्द घटकातील असावा. तसे जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिका-याने दिलेले असावे.


३. लाभार्थी शेतकरी ग्रामीण भागातील रहिवासी असावा (ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला जोडणेत यादा).


४. लाभार्थी शेतक-याचे उत्पन्न रु.१.०० लक्ष पेक्षा जास्त नसावे (तहसिलदार यांचा सन- २३-२४ बा उत्पन्नाचा दाखला जोडावा)


५. लाभार्थी शेतक-याकडे किमान ०५ जनावरे (गाय, म्हैस, बैल या संवर्गातील ) असल्याचा पशुवैदयकिय अधिका-याचा पशुधन पर्यवेक्षक दाखला प्रस्तावासोबत जोडणेत यावा.


६. लाभार्थी शेतक-यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ति शासकिय/निमशासकिय सेवेत कार्यरत नसावी. (ग्रामसेवकाचा दाखला प्रस्तावासोबत जोडणेत यावा)


७. यापुर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसलेबाबत ग्रामसेवकांचा दाखला प्रस्तावासोबत जोडणेत यावा. ८. निवड झाल्यानंतर लाभार्थ्यास सदर कडबाकुटी यंत्र विकता अगर उसनवारीने देता येणार नाही याबाबत रक्कम रु १००/- च्या स्टँप पेपरवर करारनामा करुन दयावा लागेल.


९. लाभार्थी निवडीचा मासिकसभा ठराव असावा.


१०. लाभार्थ्याचे वय १८ ते ६० वर्ष असावे. लाभार्थीने प्रस्तावासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड करावीत, अर्जासोबत चालू स्थितीतील बँक खाते पासबुक व आधारकार्डची झेरॉक्स जोडावी.

मागासवर्गीय व्यक्तिंना स्वयंरोजगारासठी पिठाची गिरणी घेणेकरिता अर्थसहाय्य पुरविणे

Pithachi girani yojana 2024




१. विहीत नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरावा.


२. लाभार्थी व्यक्ति अनु जाती, अनु जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौध्द घटकातील असावा. तसे जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिका-याने दिलेले असावे,


३. लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा


४. लाभार्थी याचे उत्पन्न रु.१.०० लक्ष पेक्षा जास्त नसावे (तहसिलदार यांचा सन- २३-२४ चा उत्पन्नाचा दाखला जोडावा)


५. लाभार्थी शेतक-यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ति शासकिय/निमशासकिय सेवेत कार्यरत नसावी. (ग्रामसेवकाचा दाखला प्रस्तावासोबत जोडणेत यावा) ६. यापुर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसलेबाबत ग्रामसेवकांचा दाखला प्रस्तावासोबत जोडणेत यावा.


७. निवड झाल्यानंतर लाभार्थ्यास सदर पिठाची गिरणी विकता अगर उसनवारीने देता येणार नाही याबाबत रक्कम रु १००/- च्या स्टँप पेपरवर करारनामा करुन दयावा लागेल.


८. लाभार्थी निवडीचा मासिकसभा ठराव असावा.


९. लाभार्थ्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे.


लाभार्थीने प्रस्तावासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड करावीत, अर्जासोबत चालू स्थितीतील बँक खाते पासबुक व आधारकार्डची झेरॉक्स जोडावी.



मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी अनुदान देणे


१. विहीत नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरावा.


२. लाभार्थी व्यक्ति अनु जाती, अनु जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौध्द घटकातील असावा. तसे जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिका-याने दिलेले असावे.


३. लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावे.


४. लाभार्थी शेतक-याचे उत्पन्न रु.१.०० लक्ष पेक्षा जास्त नसावे (तहसिलदार यांचा सन- २३-२४ चा उत्पन्नाचा दाखला जोडावा)


५. लाभार्थी शेतक-यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ति शासकिय/निमशासकिय सेवेत कार्यरत नसावी. (ग्रामसेवकाचा दाखला प्रस्तावासोबत जोडणेत यावा)


६. यापुर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसलेबाबत ग्रामसेवकांचा दाखला प्रस्तावासोबत जोडणेत यावा. ७. लाभार्थी निवडीचा मासिकसभा ठराव असावा.


लाभार्थीने प्रस्तावासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड करावीत, अर्जासोबत चालू स्थितीतील बँक खाते पासबुक व आधारकार्डची झेरॉक्स जोडावी.



इ. ५ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विदयार्थीनींना लेडीज सायकल पुरविणे

Ladies cycle yojana 2024

१. विहीत नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरावा.


२. लाभार्थी विदयार्थीनी अनु जाती, अनु जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व


नवबौध्द घटकातील असावा. (शाळेचे बोनाफाईड जोडावे) ३. लाभार्थी विदयार्थीनी अहमदनगर जिल्हयातील ग्रामीण भागातील रहिवासी असावे.


४. लाभार्थी शेतक-याचे उत्पन्न रु.१.०० लक्ष पेक्षा जास्त नसावे (तहसिलदार यांचा सन- २३-२४ चा उत्पन्नाचा दाखला जोडावा)


५. लाभार्थी शेतक-यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ति शासकिय/निमशासकिय सेवेत कार्यरत नसावी.


(ग्रामसेवकाचा दाखला प्रस्तावासोबत जोडणेत यावा) ६. यापुर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसलेबाबत ग्रामसेवकांचा दाखला प्रस्तावासोबत जोडणेत यावा,


७. लाभार्थी विदयार्थीनी ५ वी ते १० वी इयत्तेत शिक्षण घेत असावी.


८. लाभार्थी निवडीचा मासिकसभा ठराव असावा.


लाभार्थीने प्रस्तावासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड करावीत, अर्जासोबत चालू स्थितीतील बँक खाते पासबुक व आधारकार्डची झेरॉक्स जोडावी.


सुचना – इच्छुकांनी संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी करावी.  


Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.