Arogya Sevika Nanded Document Verification | आरोग्य सेविका जिल्हा परिषद नांदेड कागदपत्र पडताळणी वेळापत्रक

 

नांदेड जिल्हा परिषद आरोग्य सेविका पदाचे कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर!

लातूर झेडपी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या तारखेला मिळणार ऑर्डर्स

 पहा कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवार यादी आणि कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 

नांदेड झेडपी आरोग्य सेवक महिला अंतिम निवड यादी येथे क्लिक करा.

 जिल्हा परिषद नांदेड सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत आरोग्य सेविका या पदासाठी ऑनलाईन परिक्षा दिनांक १९/०७/२०२४ व दिनांक २४/०७/२०२४ रोजी घेण्यात आली आहे. IBPS कंपनी कडून प्राप्त निकाल  जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला आहे.  प्रवर्ग निहाय गुणानुक्रमे कागदपत्रे तपासणीसाठी बोलाविण्यात येणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. आरोग्य सेविका या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक, व्यवसायिक (तांत्रिक अर्हता) व अनुभव प्रमाणपत्र व इतर आवश्यक सर्व मुळ कागदपत्रे / दस्ताऐवज तपासणी / पडताळणी दिनांक १८/०९/२०२४ बुधवार रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा प्रशिक्षण संघ, वजीराबाद, नांदेड येथे करण्यात येणार आहे.

ग्रामसेवक पेसाचे निकाल जाहीर येथे क्लिक करा


तरी आपण कागदपत्रे तपासणीसाठी आवेदन पत्राची प्रत तसेच जाहिरातीमधील परिच्छेद क्र. (१९) मध्ये नमूद केलेली आरोग्य सेविका या पदासाठीचे सर्व शैक्षणिक, व्यवसायिक (तांत्रिक अर्हता) व अनुभव प्रमाणपत्र व इतर आवश्यक सर्व मुळ कागदपत्रे व त्यांची एक छायांकित प्रत स्वयं साक्षांकित केलेल्या प्रतीसह दिनांक १८/०९/२०२४ बुधवार रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा प्रशिक्षण संघ, वजीराबाद, नांदेड येथे न चुकता उपस्थित रहावे. मुळ कागदपत्रे / दस्तऐवज तपासणी / पडताळणी करिता गैरहजर राहिल्यास, गैरहजर राहणा-या उमेदवारांती चिवड प्रक्रिया संबंधात कोणताही दावा करता येणार नाही, किंवा हक्क सांगता येणार नाही.

Nanded arogya sevika document list for verification

 कागदपत्र पडताळणी साठी आवश्यक कागदपत्रांची यादी  

1)     उमेदवारांनी ज्या पदासाठी आवेदन पत्र भरले आहे त्याची छायांकित प्रत

2)     अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोपणापत्र

3)     वयाचा पुरावा

4)     सर्व शैक्षणिक अर्हतेचा पुरावा

5)     जन्माचा पुरावा

6)     आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा

7)     राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांच्या संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र

8)     नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (चालू आर्थिक वर्षातील)

9)     पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा

10)  पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा

11)  खेळाडूसाठी आरक्षणासाठी पात्र असल्यास पुरावा

12)  अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा

13)  महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र

14)  महाराष्ट्र कर्नाटक सिमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्ये ६५ गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिका-याचा विहित नमुन्यातील दाखला

15)   विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा

16)  मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा

17)  लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र

18)  पदवीधर / पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र

19)  MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र

20)  टंकलेखन प्रमाणपत्र

21)  लघुलेखन प्रमाणपत्र

22)  व्यवसायिक / तांत्रिक / अनुभव प्रमाणपत्र

23)  उमेदवारांचा ओळखपत्रे (आधार कार्ड/ पॅन कार्ड / मतदान कार्ड)

24)  उमेदवार शार्साकय कर्मचारी असल्याचा नियुक्तो प्राधिकारी यांनी दिलेले परवानगी पत्र

25)  उमेदवाराचे स्वतःचे छायाचित्र (फोटो)

 

नांदेड झेडपी आरोग्य सेविका ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांची यादी येथे क्लिक करा.

नांदेड झेडपी आरोग्य सेविका ( ANM ) पदाची कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवार यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Nanded Zp Arogya Sevika Document Verification 2023

कागदपत्र पडताळणी वेळापत्रक आणि संबंधित सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.