Beed Home Guard Bharti Ground Timetable 2024 | बीड होम गार्ड भरती मैदानी चाचणी वेळापत्रक

 बीड होम गार्ड भरती २०२४ मैदानी चाचणी आणि कागदपत्र पडताळणीला सुरुवात . 

पहा सविस्तर वेळापत्रक   

Beed home guard bharti 2024 ground time table


बीड जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी करीता बीड जिल्हयातील ज्या रहीवासी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला आहे त्यांचेकरीता खालील प्रमाणे नोंदणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सदर नोंदणी फक्त बीड जिल्हयातील रहीवासी उमेदवारांकरीता असून इतर जिल्हयातील ऑनलाईन अर्ज केलेले सर्व उमेदवार सदर नोंदणी करीता अपात्र आहेत. त्यामुळे बीड जिल्हा सोडून इतर जिल्हयातील उमेदवारांनी नोंदणी कार्यक्रमाकरीता उपस्थित राहू नये. त्यांना मैदानामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच रहिवासी भागातील पथक/उपपथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवार सुध्दा कागदपत्र पडताळणी मध्ये अपात्र ठरतील.

 

तसेच केज पथकात अनुशेष शिल्लक नसल्याने केज पथकातील (केज पो.स्टे., धारुर पो.स्टे. व युसुफवडगाव पो.स्टे. अंतर्गत) उमेदवारांनी उपस्थित राहु नये.

अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, शारीरीक पात्रता व क्षमता चाचणी याकरीता दि. २३/०८/२०२४ ते दि. २७/०८/२०२४ या कालावधीमध्ये दररोज पहाटे ६.०० वा. खालील प्रमाणे पोलीस मुख्यालय, अहमदनगर रोड, बीड येथे बोलाविण्यात येत आहे. उमेदवारांना स. ६.०० ते स. ०९.०० या कालावधी मध्येच मैदानात प्रवेश दिला जाईल. वेळापत्रकानुसारच त्या त्यादिवशी उमेदवारांना मैदानात प्रवेश दिला जाईल.
 

नोंदणी क्रमांकानुसारमैदानी चाचणी आणि कागदपत्र पडताळणी वेळापत्रक  

Beed home guard bharti ground time table 2024


१. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अर्जासह आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडावी. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील. उमेदवारांना नोंदणीकरीता स्वःखर्चाने उपस्थित रहावे लागेल, नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची सुपर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.

२. उमेदवारांना शारिरिक क्षमता चाचणी मध्ये पात्र होणेकरीता प्रत्येक प्रकारामध्ये ४०% गुण मिळविणे आवश्यक राहील. धावणे चाचणी प्रकारामध्ये अपात्र ठरल्यास गोळाफेक चाचणी घेतली जाणार नाही. मात्र धावणे चाचणीमधील अपात्र उमेदवारांना त्यांचे डिटेल सोबत शेवटपर्यंत थांबावे लागेल व चेस्ट क्रमांक, इ. जमा करावे लागेल. मध्येच पळून गेलेल्या उमेदवारांवर दंडात्मक कार्यवाही करणेत याची नोंद घ्यावी.

३. उमेदवारांनी कोणत्या किमती वस्तू, मोबाईल इ. आणू नयेत आणि आणल्या तर त्या स्वत्ःचे जबाबदारावर सांभाळाव्यात. याची कोणतीही जबाबदारा आयोजकांवर राहणार नाही.


सदर होमगार्ड नोंदणी प्रक्रीया अत्यंत पारदर्शक व इन-कॅमेरा पार पाडणेत येणार असुन होमगार्ड नोंदणी करीता उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. तसेच शिफारस/ वशिला इ. गैरमार्गाचा वापर करु नये. होमगार्ड नोंदणी करीता कोणी पैसे / लाचेची मागणी केल्यास तात्काळ मा. अपर पोलीस अधिक्षक, बीड मों क्र. ९९२१९०४१५१ किंवा मा. अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय बीड दुरध्वनी क्र. ०२४४२२२२६४९, १०६४ यांचेकडे तक्रार करावी. आपण याबाबत dyspacbbeed@mahapolice.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार देवू शकता.

अतिवृष्टीमुळे वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास त्याची सुचना https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येईल त्यामुळे उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरील सुचनांकरीता अद्यावत रहावे. उमेदवारांना वैयक्तीक एसएमएस किंवा फोन किंवा ईमेल वर माहिती देण्यात येणार नाही.


Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.