Arogya Sevika Beed Document Verification | बीड आरोग्य सेविका कागदपत्र पडताळणी तारीख जाहीर !

 

बीड जिल्हा परिषद आरोग्य सेविका कागदपत्र पडताळणी 

तारीख जाहीर !

चार दिवस होणार कागदपत्र पडताळणी 

Beed zp arogya sevika document verification

👉नांदेड झेडपी आरोग्य सेविका कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 👈

👉आरोग्य सेविका बीड झेडपी अंतिम निवड यादी

जिल्हा परिषद पदभरती २०२३ बीड जिल्हा परिषदे अंतर्गत आरोग्य सेवीका ( arogya sevika beed ) या संवर्गाच्या २८४  इतक्या जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली होती या मध्ये जवळपास १४६७ इतक्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले होते तसेच त्या सर्व उमेदवारांची परिक्षा दिनांक १६ जून २०२४ रोजी या एकाच दिवशी विविध तीन सत्रामध्ये घेण्यात आली व त्या परीक्षेमध्ये किमान ४५ % गुण मिळवलेल्या उमेदवारांची सामाईक गुणांची यादी बीड जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक १२ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने दिनांक २३/०८/२०२४ रोजी जिल्हा परिषद बीड च्या अधिकृत संकेतस्थळावर कागदपत्रे पडताळणी साठी पात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक जाहीर केले आहे.

सोबतच कागदपत्र पडताळणी साठी पात्र उमेदवारांना त्यांच्या ईमेल वरही कळवीण्यात आले आहे. २८४ जागांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत केवळ २१३ उमेदवार ४५ टक्के गुण मिळवून पास झाले असून त्या सर्वच उमेदवारांना कागदपत्र पडताळणी साठी बोलावण्यात आले आहे, २८४ जागा असून फक्त २१३ च उमेदवार पास झाल्याने बऱ्याच जागा रिक्त राहणार आहेत. या संवर्गाची कागदपत्र पडताळणी ४ दिवस चालणार असून दिनांक २८ ऑगस्ट २०२४ पासून दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत रोज पहिले तीन दिवस ५० उमेदवार बोलावण्यात येणार असून ३१ ऑगस्ट २०२४ रोजी ६३ उमेदवार बोलावण्यात आले आहेत . कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढे पात्र उमेदवारांची फायनल निवड यादी लावून त्यांना नियुक्त्या दिल्या जातील. 

बीड आरोग्य सेविका जागा तपशील
 

बीड आरोग्य सेविका प्राप्त गुणांची यादी पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.

कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवार यादी तसेच कागदपत्र पडताळणी टाइम टेबल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.