Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
"Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana"
👉मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल येथे क्लिक करा.👈
महाराष्ट्र राज्यातील महिलामध्ये अनिमिया प्रमाण 50 पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील
श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10 टक्के व स्त्रीयांची टक्केवारी 28.70 टक्के
इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे
आवश्यक आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा
करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री-
माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
योजनेचे स्वरूप
पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक
केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.1,500/-
इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे
रु.1,500/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात
येईल.
योजनेचे लाभार्थी
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, विधवा,
घटस्फोटीत, परितकत्या आणि निराधार महिला.
👇
*सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येत आहे*
योजनेसाठी पात्रता
(१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
(२) राज्यातील विवाहित, विधवा,घटस्फोटीत, परितकत्या,कुटुंबातील एक अविवाहित महिला आणि निराधार महिला.
(३) किमान वयाची 21 वषे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
(४) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक
आहे.
(५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
{ पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्न दाखल्यात सुट देण्यात येत आहे }
कोण नसेल पात्र
(१) ज्यांच्या कु टुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
(२) ज्याच्या कु टुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
(३) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी
विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थमध्ये कार्यरत
आहेत अथवा सेवानिवृत्ति वेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले
तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
(४) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे
रु.1,500/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
(५) ज्यांच्या कु टुंबातील सदस्य विद्यमान अथवा माजी खासदार/आमदार आहे.
(६) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या
बोर्ड/कार्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
(७) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कु टुंबातील सदस्यांच्या नावावर
नोंदणीकृत आहेत.
*५ एकर शेतीची मर्यादा असणारी अट रद्द करण्यात आली आहे*
आरोग्य सेवक ४० % निकाल जाहीर येथे क्लिक करा.
सदर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
mukhyamantri majhi ladaki bahin yojana documents
(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा.
(२) लाभार्थ्याचे आधार कार्ड.
(३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
{ लाभार्थी महिलेकडे १५ वर्ष जुने रेशन कार्ड,मतदार ओळखपत्र,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला असेल तर त्यांना अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.}
(४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला
(वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखाच्या आत असणे अनिवार्य. जर पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड उपलब्ध नसेल तर ).
(५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
(६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
(७) रेशन कार्ड .
(८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
👉ऑफलाईन अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज कुठे करावा ?
mukhyamantri mazi ladaki bahin yojana online application
योजनेचे अर्ज पोर्टल /मोबाइल ॲपद्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन
भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:-
(१) पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
२) ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी "अर्ज" भरण्याची सुविधा
अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कायालये
(नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वॉर्ड /सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
(३) वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कायालये
(नागरी/ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरीत्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती
दिली जाईल.
(४) अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
(५) अर्जदार महिलेलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे
आवश्यक आहे.
1. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
2. स्वतःचे आधार कार्ड
ONLINE अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024
👉असा भरा ऑफलाईन अर्ज👈
या योजनेचा GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
🆕सुधारित GR येथे क्लिक करा.
Post a Comment