Maharashtra Home Guard Bharti 2024 | ऑनलाईन अर्ज सुरू 6900 जागा.

 

 महाराष्ट्र होम गार्ड भरती २०२४ ऑनलाईन अर्ज सुरू.

६९०० जागा, पहा सर्व जिल्ह्याच्या जाहिराती.  

Home Guard Bharti 2024


देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे, कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचालित पूर्णता मानसेवी तत्वावर आधारित आहे या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही हे सदस्यत्व तीन वर्षाकरिता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन-तीन वर्षाच्या टप्प्याने वयाच्या ५८ वर्षापर्यंत पुन्हा नोंदणी करता येते.राज्यात जवळपास २४ जिल्ह्यांमध्ये होमगार्ड या पदाची भरती केली जात असून यामध्ये जवळपास 6900 इतके उमेदवार घेण्यात येणार आहेत आणि त्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

बीड होम गार्ड मैदानी चाचणी वेळापत्रक २०२४ येथे क्लिक करा.

होमगार्ड ची कर्तव्य :- होमगार्ड्सना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणी प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई-महामारी काळात, संप काळात प्रशासनास मदतकार्य असे कर्तव्य दिली जातात.

👉 ग्रामसेवक पदाचा निकाल जाहीर ! पहा सर्व झेडपीचे निकाल येथे क्लिक करा. 👈


होमगार्डसना देय्य भत्ते :- होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रुपये ५७० कर्तव्य भत्ता व रुपये १०० उपहारभत्ता दिला जातो तसेच प्रशिक्षण काळात रुपये ३५ खिसाभत्ता व रुपये १०० भोजन भत्ता व साप्ताहिक कवयतीसाठी रुपये ९० कवायती भत्ता दिला जातो.


होमगार्ड नोंदणी :- होमगार्ड नोंदणी करिता कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही सदस्यत्व मिळवण्याकरिता कोणत्या इतर मार्गाचा अवलंब करू नये याकरिता कोणी पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय मा. जिल्हासमादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा.


होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे :- सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान, विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण, तीन वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या होमगार्डसना पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये ५  टक्के आरक्षण दिले जाते. प्रथमउपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी. गौरवास्पद  कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळविण्याचे संधी. स्वतःचा व्यवसाय, शेती इत्यादी सांभाळत देश सेवा करण्याची संधी.


होमगार्ड नोंदणी नियम व अटी

  होमगार्ड पात्रतेचे निकष 

शैक्षणिक पात्रता :- कमीत कमी १० वी उत्तीर्ण  

वय :- २० ते ५० वर्षे [ दिनांक  ३१/०७/२०२४  रोजी ] 

उंची :- पुरुषांकरिता १६२ सेमी महिलांकरिता १५० सेमी 

छाती :- [फक्त पुरुष उमेदवारांकरिता]  न फुगविता किमान ७६ सेमी  फुगवून ७६+५ सेमी आवश्यक.


आवश्यक कागदपत्रे 

१} रहिवासी पुरावा:-  यामध्ये आधार कार्ड मतदान ओळखपत्र [दोन्ही अनिवार्य]

 २} शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र 

३} जन्मदिनांक पुराव्या करिता एसएससी बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला 

४} तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र 

५} खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र 

६} तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र

maharashtra home guard bharti 2024 physical test details

शारीरिक क्षमता चाचणी

धावणे पुरुष उमेदवार १६०० मीटर {२० गुण } महिला उमेदवार ८०० {मीटर २५ गुण}

*(धावणे चाचणीत पात्र होण्यासाठी किमान १० गुण मिळवणे आवश्यक)*


गोळा फेक पुरुष उमेदवार ८.५० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त
{१०  गुण }

  महिला गोळाफेक उमेदवारंकरिता ६ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त {१० गुण}
(गोळाफेक मध्ये पात्र होण्यासाठी किमान ४ गुण मिळवणे आवश्यक) 

नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचा कालावधी

maharashtra home guard bharti 2024 online form date

१५ जुलै २०२४ ते १७ ऑगस्ट २०२४ 

 

*वेगवेगळ्या जिल्हयासाठी अर्ज करण्याचा कालावधी वेगवेगळा आहे याची नोंद घ्यावी व त्या त्या जिल्ह्याचा ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी त्या जिल्ह्याच्या जाहिरातीत पाहून घेणे*

 जाहिराती पाहण्यासाठी खाली प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती लिंक दिल्या आहेत त्यावर क्लिक करून जाहिराती डाउनलोड करणे.  

Satara home guard bharti 2024

Nanded home guard bharti 2024

Ratnagiri home guard bharti 2024

Jalgaon home guard bharti 2024

Chandrapur  home guard bharti 2024

Yavatmal home guard bharti 2024

Sindhudurg home guard bharti 2024

Dhule home guard bharti 2024

Hingoli  home guard bharti 2024

Amravati home guard bharti 2024

Beed home guard bharti 2024

Osmanabad home guard bharti 2024

Washim home guard bharti 2024

Bhandara home guard bharti 2024

Nandurbar home guard bharti 2024

Gadchiroli home guard bharti 2024

Raigad home guard bharti 2024

Latur home guard bharti 2024

Pune home guard bharti 2024

Sangali home guard bharti 2024

Nashik home guard bharti 2024

Kolhapur home guard bharti 2024

Wardha home guard bharti 2024

Aurangabad home guard bharti 2024


maharashtra home guard bharti 2024 apply online

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा.👈

👉maharashtra home guard official website👈

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.