MAHARASHTRA ANGANWADI BHARTI 2023 अंगणवाडी भरतीला स्थगिती !

 अंगणवाडी भरतीला स्थगिती !

 ANGANWADI BHARTI 2023 राज्यातील २०६०१ अंगणवाडी कर्मचारी भरतीला मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून, १७ एप्रिल २०२३ पर्यंत स्थगिती देण्यात आल्याची माहिती एकात्मिक बाल  विकास योजनेचे आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे . 

 ANGANWADI BHARTI 2023

 

 ANGANWADI BHARTI 2023

रिक्त असलेल्या ४, ५०९ अंगणवाडीसेविका, ६२६ मिनी अंगणवाडी सेविका आणि १५ हजार ४६६ मदतनीस अशा २० हजार ६०१ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ३१ मे २०२३ पर्यंत भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी जाहिराती देऊन अर्जही स्वीकारण्यास सुरुवात केली होती पण अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी सुधारित शैक्षणिक पात्रतेबाबत मा. उच्च न्यायालयात धाव घेतली,आणि आक्षेप घेणारी याचिका दाखल केली होती, त्या याचिकेवर सुनावणी झाल्यावर  मा. उच्च न्यायालयाने "Maharashtra anganwadi bharti 2023" या भरती प्रक्रियेस १७ एप्रिल २०२३ पर्यंत स्थगिती दिली आहे. 

 ANGANWADI BHARTI 2023

अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस या दोन्ही पदांसाठी  शैक्षणिक पात्रता हि १२ वी पास करण्यात आली आहे, त्या बाबत अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी आक्षेप घेतला आहे . बऱ्याच जिल्ह्यांत भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती, जाहिराती प्रसिद्ध करण्यात येऊन ऑफलाईन अर्ज हि मागवण्यात आले होते परंतु मा. उच्च न्यायालयाकडून स्थगिती आल्यामुळे तूर्तास उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. आशा आहे भरती प्रक्रियेला परत लवकरच सुरुवात होईल.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी:- येथे क्लिक करा


Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.